मुंबई, 1 एप्रिल : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यता आली आहे. जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. धमकीनंतर प्रथमच राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले राऊत?
आपल्याला आलेल्या धमकीनंतर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा गद्दार गटाच्या सुरक्षेसाठीच आहे. राज्यातील कायदा व सुवव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही. सलमान खानला धमकी दिलेल्या गँगकडून मला धमकी आली आहे. विरोधकांना मारून टाकण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघात धमकीनंतर संजय राऊत यांनी केला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांना आलेल्या या धमकीच्या मॅसेजमुळे खळबळ उडाली आहे. हा धमकीचा मॅसेज राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. ‘हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॅारेन्स के और से मॅसेज है…. सलमान और तू फिक्स….तयारी करके रखना….’ असं या मॅसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.