मुंबई, 16 एप्रिल : बीसीसीआय भारतीय क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मागील काळात अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. महिला प्रीमियर लीग सुरु करण्यासह यंदाच्या आयपीएल सारख्या जगप्रसिद्ध लीगमध्ये देखील मोठे बदल करत असताना आता डोमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारी जय शहा यांनी याबाबत ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिस रकमेत वाढ करत असल्याचे सांगितले. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला असून याअंतर्गत रणजी ट्रॉफी , इराणी ट्रॉफी , दुलीप ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, वरिष्ठ महिला वन डे ट्रॉफी, वरिष्ठ महिला ट्वेंटी-20 ट्रॉफी इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे.
I’m pleased to announce an increase in prize money for all @BCCI Domestic Tournaments. We will continue our efforts to invest in Domestic Cricket – which is the backbone of Indian Cricket. Ranji winners to get ₹5 crores (from 2 cr), Sr Women winners ₹50 lacs (from 6 lacs)🇮🇳 pic.twitter.com/Cgpw47z98q
— Jay Shah (@JayShah) April 16, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.