बुलढाणा, 25 एप्रिल : सध्या देशात आयपीएल फिवर सुरू आहे. शाळा महाविद्यालयालाही उन्हाळ्याच्या सुट्टी असल्याने मैदानावरही मुलं खेळताना पाहायला मिळत आहे. खेळ म्हटलं की किरकोळ वाद आलेच. पण, याच वादातून एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. बॅट तोडली म्हणून 300 रुपये घेतल्याने अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना समोर आली. धक्कादायक म्हणजे आरोपी देखील अल्पवयीन आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात क्रिकेटच्या वादातून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मलकापूर शहरातील नूतन हायस्कूलच्या मैदानावर क्रिकेट खेळताना यश चव्हाण नामक सतरा वर्षीय मुलाची सुमित पिवाल नामक मुलाने क्रिकेट खेळताना बॅट तोडली, त्याची भरपाई म्हणून यशने त्याच्याकडून तीनशे रुपये वसूल केले. याचा राग मनात धरून सुमितने मलकापुरातील नूतन हायस्कूलच्या मैदानावर यशच्या पोटात धारदार चाकूने वार केले. यावेळी यश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याला तात्काळ आधी मलकापूर त्यानंतर बुलढाणा येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान यशचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केवळ तीनशे रुपयावरून हा वाद विकोपाला गेला आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा जीव गेला आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपी सुमित पवार विरोधात कुणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मलकापूर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
व्हॉटसॲपद्वारे महिलेशी अश्लील चॅटींग करणाऱ्या एकाला अटक
व्हॉटसॲपद्वारे महिलेशी अश्लील चॅटींग करणाऱ्या एका सायबर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई 15 मार्च रोजी रात्री उशिरा करण्यात आली. याप्रकरणी पीडितेने सायबर पोलीस स्टेशनमध्ये 17 जानेवारी रोजी तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने व्हर्च्युअल मोबाइल क्रमांकावरुन व्हाटसॲपद्वारे अश्लील चॅटींग करुन पीडित महिलेला लज्जा वाटेल असे मेसेज पाठविले.
वाचा – 69 वर्षीय महिलेला प्लॅन करून संपवलं, कामवालीबाईची एक चूक झाली आणि…
ऐवढेच नव्हे तर ऑनलाइन पाठलाग करुन त्याची ओळख लपवून शिविगाळ केली. त्या महिलेला ‘तु राहतेस त्या गावी येऊन बदनामी करेन’ अशी धमकी दिली. अशा तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान तपासात मिळालेल्या तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे फिरोज ताज मोहम्मद पठाण (रा.तळणी, ता. मंठा,जि.जालना) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.