बेळगाव, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवंल आहे. कर्नाटकात यावेळीही जारकीहोळी बंधूंनी विजय मिळवला. कर्नाटकच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचा मोठा दबदबा आहे. यावेळच्या निवडणुकीत तिन्ही भावांनी विजय मिळवला. यातील दोघांनी काँग्रेसकडून तर एकाने भाजपच्या तिकिटावर जागा जिंकली.
सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. ते यमकनमर्दी विधानसभा मतदारसंघातून उभा राहिले होते. त्यांनीही पुन्हा एकदा विजय मिळवला असून त्यांनी जवळपास 60.42 टक्के मते मिळवली आहेत.
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू, दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावलं
दोन भाऊ भाजपच्या तिकिटावर विजयी
भालचंद्र जारकीहोळी हे भाजपच्या तिकिटावर अरभावी मतदारसंघातून मैदानात उतरले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार भीमप्पा गुंडप्पा गडग यांचा पराभव केला. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातल्या या मतदारसंघात 2018 मध्ये भाजपनेच विजय मिळवला होता.
बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रमेश जारकीहोळी यांनी विजय मिळवला. रमेश जारकीहोळी हे 1999 पासून या मतदारसंघातून जिंकत आले आहेत. यावेळीही ते भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
एक दिवस प्रचार अन् 1 लाखांच्या फरकाने हरवलं; कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री होणार हे जायंट किलर?
बेळगावच्या राजकारणात जारकीहोळींचे वर्चस्व
जारकीहोळी कुटुंबात पाच जण भाऊ आहेत. त्यापैकी चौघे राजकारणात सक्रीय आहेत. यातले रमेश आणि भालचंद्र हे भाजपमध्ये आणि लखन आणि सतीश जारकीहोळी हे काँग्रेसमध्ये आहेत. तर पाचवे बिमाशी हे आहेत. बेळगावच्या राजकारणात या पाच भावंडांचा दबदबा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.