बेळगाव, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळालंय. तर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का बसला. एकाही जागी महाराष्ट्र एकीकरण समितीला विजय मिळवता आलेला नाही. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 जागी काँग्रेसने विजय मिळवला तर 7 जागा भाजपने जिंकल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमाभागातील सर्व उमेदवारांचा पराभव झाला.
सीमाभागात एकूण 6 मतदारसंघ असून या मतदारसंघात महाराष्ट्रातील नेते मराठी उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले होते. यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रचार केला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भागामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. सीमाभागात बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू, दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावलं
महाराष्ट्र एकीकऱण समितीचे पराभूत उमेदवार
1. बेळगाव दक्षिण – रमाकांत कोंडुरकर (महाराष्ट्र एकीकरण समिती)
2. बेळगाव उत्तर – अमर येळ्ळूरकर (एकीकरण समिती)
3. बेळगाव ग्रामीण – आर. एम. चौगुले (एकीकरण समिती)
4. निपाणी – जयराम मिरजकर (एकीकरण समिती)
5. यमकनर्डी – मारुती नाईक (एकीकरण समिती)
6. खानापूर –मुरलीधर पाटील (एकीकरण समिती)
बेळगाव जिल्ह्यातील १८ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर ७ जागा भाजपने जिंकल्या. भाजपच्या एका बंडखोर उमेदवाराने काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला.
बेळगाव जिल्हा निवडणूक निकाल
1) दक्षिण – अभय पाटील – BJP
2) खानापूर – विठ्ठल हलगेकर BJP
3) निपाणी – शशिकला जोल्ले BJP
4) गोकाक – रमेश जारकीहोळी-BJP
5) आरभावी – भालचंद्र जारकिहोळी – BJP
6) हुक्केरी – निखिल कित्ती BJP
7) अथणी – लक्ष्मण सौदी – CONG (भाजप बंडखोर)
8) कागवड – भरमगौडा कागे- CONG
9) कित्तुर -बाबासाहेब पाटील CONG
10 ) बैलहोनगल – महानतेश कौझलगे CONG
11) कुडची – महेंद्र तमन्नावर- CONG
12) सौदत्ती – विश्वास वैद्य- CONG
13) रामदुर्ग – अशोक पट्टण-CONG
14) यमकनगर्डी -सतीश जारहीहोळी CONG
15) चिकोडी – गणेश हुक्केरी CONG
16) बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर – CONG
17) उत्तर – राजू शेठ – CONG
18) रायबाग – दुर्योधन ऐवळे BJP
एक दिवस प्रचार अन् 1 लाखांच्या फरकाने हरवलं; कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री होणार हे जायंट किलर?
काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेससाठी बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी तयारी सुरू आहे. काँग्रेस सरकार स्थापन झालं आणि तेही पूर्ण बहुमत झाल्यावर सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व आमदारांना दाखले घेऊन बंगळुरूला येण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सातत्याने अहवाल घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.