बेळगाव, 4 मे : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेतेही आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी जात आहेत. मात्र, त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आधी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टिळक चौकात काळे झेंडे दाखवण्यात आले होते. आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने काळे झेंडे दाखवून विरोध केला.
अशोक चव्हाण यांना बेळगावात दाखवले काळे झेंडे
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि सतेज पाटील आज पक्षाच्या प्रचारासाठी बेळगावात आले होते. यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी बेनकनहळ्ळी या गावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी काळे झेंडे दाखवत अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांचा निषेध केला.
Video : काँग्रेस नेत्यांना बेळगावात धाकवले काळे झेंडे#belgaon #KarnatakaAssemblyElection pic.twitter.com/e914uAbPhe
— News18Lokmat (@News18lokmat) May 4, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.