नवी दिल्ली 01 मे : राजधानी दिल्लीत काल रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास आश्रम चौकाकडून निजामुद्दीन दर्ग्याच्या दिशेने येणारी एक कार बोनेटला लटकलेल्या व्यक्तीसह सुमारे 2-3 किलोमीटर रस्त्यावर धावत होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या कारचा पाठलाग करून बोनेटवर लटकलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार बिहारचे लोकसभा खासदार चंदन सिंह यांची असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी खासदार गाडीत उपस्थित नव्हते, चालक गाडी चालवत होता. पोलिसांनी बेजबाबदारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
#WATCH | Delhi: At around 11 pm last night, a car coming from Ashram Chowk to Nizamuddin Dargah drove for around 2-3 kilometres with a person hanging on the bonnet. pic.twitter.com/54dOCqxWTh
— ANI (@ANI) May 1, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.