मुंबई, 23 मे : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ वाघाच्या जोडप्याचा आहे. या व्हिडीओत केलेल्या शिकारीसाठी दोन वाघ भांडताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ रणथंबोर नॅशनल पार्कमधील आहे, येथे जंगल सफारी करायला गेलेल्या काही पर्यटकांनी आपल्या कॅमेरामध्ये घडलेला प्रसंग कैद केला. शिकारी प्राणी शिकार केल्यानंतर कसे वागतात. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही खास क्लिप लेटेस्ट साईटिंग्जच्या अधिकृत यूट्यूब चॅनलने शेअर केली आहे.
दबक्या पावलांनी येत बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार, Video पाहून उडेल थरकाप
राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये वाघ आणि वाघिणीमध्ये हिंसक लढाई झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या मारामारीत दोघेही एकमेकांशी भिडले आणि त्यांच्यात झालेल्या भांडणाचे कारण म्हणजे वाघाने केलेली शिकार.
वाघाने एका हरणाला मारले आणि तिथेच ठेवले होते. यानंतर तो पुढे गेल्यावर वाघीण त्याच्या मागून आली आणि तिला वाघाचे भक्ष खायचे होते. ती वाघाने केलेली शिकार खातच होती की तेवढ्यात वाघ तेथे आला आणि त्याने थेट वाघिणीवर हल्ला केला. या हल्ल्याने वाघिणी घाबरली ती मागे झाली. पण तरीही दोघांमध्ये भांडणं सुरु राहिली.
जंगली प्राण्यांना पाळणं महागात पडलं, मांस घालायला गेला आणि त्याची उरली 2 हाडं
पुढे काहीवेळ ही भांडणं थांबतात, पण पुन्हा वाघ आणि वाघीणीत भांडणं सुरु होतात. अखेर वाघीणीला बलाढ्य वाघासमोर हार मानावी लागली. त्यानंतर वाघ आपल्या भक्षाला घेऊन तेथून निघून गेला आणि वाघिण ते सगळं पाहात बसली होती.
हा व्हिडीओ 12 दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. पण या व्हिडिओला 1 मिलीयनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, या व्हिडीओवर लोक कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.