भटिंडा, 17 एप्रिल : पंजाबच्या भटिंडा लष्करी कॅम्पमध्ये चार जवानांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी आता देसाई मोहन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. सुरुवातीला हीच व्यक्ती प्रत्यक्षदर्शी होती. मात्र पोलिसांचा त्याच्यावर दाट संशय होता. अखेर त्याला अटक करण्यात आलीय.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भटिंडा लष्करी कॅम्पमध्ये गोळीबाराच्या घटनेत प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीलाच हत्या प्रकरणी अटक करण्यात आलीय. सीआयएमध्ये त्याची पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. देसाई मोहनने या चौकशीत धक्कादायक असे खुलासे केले आहेत. चारही जवानांनी लैंगिक शोषण केल्यानं त्यांची हत्या केल्याचा जबाब देसाई मोहनने दिला.
बुधवारी पहाटे चार जवानांची भटिंडा लष्करी कॅम्पमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेवेळी सर्व जवान त्यांच्या बराकीत होते. मृतांमध्ये गनर सागर बन्ने, करनालेश आर, योगेश कुमार जे आणि संतोश एम नागराल यांचा समावेश आहे. सर्वजण आर्टिलरीच्या ८० मीडियम रेजिमेंटचे होते.
घटनास्थळी इंसास रायफलच्या १९ रिकाम्या पुंगळ्या सापडल्या होत्या. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी म्हणून पुढे आलेल्या देसाइ मोहनने रायफलसह हल्लेखोरांना पाहिल्याचा दावा केला होता. त्याच्या जबाबानुसार दोन अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गोळीबाराच्या घटनेनंतर या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी १० जवानांना नोटीस पाठवली होती.
चार जवानांच्या हत्या प्रकरणी गनर देसाई मोहनच्या भूमिकेबाबत पोलिसांना दाट संशय होता. देसाई मोहनने हल्लेखोरांचे वर्णन करताना कुर्ता पायजमा, कुऱ्हाड वगैरेची माहिती दिली होती. शेवटी तपासानंतर त्यालाच अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.