मुंबई 20 मे : सध्या राज्यासह देशभरातच तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. दुपारच्या वेळी नागरिक घराच्या बाहेर पडत नसल्याचं चित्र सगळीकडेच दिसत आहे. या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत मान्यून पुढे सरकण्याची परिस्थिती अनुकूल आहे. दुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार, अंदमानामध्ये मान्सून उशिरा दाखल होणार आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत असून तो उशिरा दाखल होईल. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 9 ते 15 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे.
Mumbai Weather Update : वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांना मिळाला महत्त्वाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाला सुरुवात होईल. दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे. यंदा पाऊस कमी पडू शकतो. कारण अल नीनोचा परिणाम पावसावर होणार आहे.
भारतात अन नीनोची स्थिती कमजोर झाली आहे. पावसाळ्यात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितलं की, पुढील अपडेट जूनच्या पहिल्या आठवड्यात दिली जाईल. तोपर्यंत स्थिती आणखी स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.