जंजगीर चंपा (लखेश्वर यादव), 07 मे : छत्तीसगडमधील जंजगीर चंपा जिल्ह्यातील सारागावजवळ राष्ट्रीय महामार्ग 49 वर एक अनियंत्रित कार विजेच्या खांबाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात कारने पेट घेतला. कारमधील चारही जण थोडक्यात बचावले आहेत. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा साओ (22), शिवकुमार साहू (40), नोहर साहू (50) बिलासपूर हे एका मुलासह बरद्वारहून रायपूरला कारमधून परतत होते. दरम्यान काल सारागाव नगरच्या NH 49 वर कार अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला धडकली. कारमधील चारही जण गंभीर जखमी झाले आहेत.
…तर मी गळफास घेईन; पैलवानांनी केलेल्या गंभीर आरोपांवर बृजभूषण यांची प्रतिक्रिया
दरम्यान विजेच्या खांबाला धडकल्याने कारने पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लोकांच्या मदतीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
सारागाव पोलिस ठाण्यात तैनात एएसआय दौलाल बरेथ तेथून जात होते. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस आणि डायल 112 च्या मदतीने कारमधील प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले.
दिनेश कार्तिकची एक चूक RCBला पडली महागात, दिल्लीने सहज जिंकला सामना
या कारवाईमुळे चारही जणांचे प्राण वाचले, मात्र आगीत कार जळून खाक झाली. या कारवाईत सारागाव पोलिसांचे कौतुकास्पद योगदान होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.