मुंबई, 6 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादीत हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. त्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा परत घेतला. मात्र शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होणार नसल्याची बातमी समोर आली होती. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना शिंदे, फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले आहिर?
मविआच्या वज्रमूठ सभा होणार नसल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता यावर सचिन आहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मे महिन्यात सभा घेण्यात येऊ नये असं आधीच ठरलं होतं. मात्र आता पुढच्या काळातही सभा सुरूच राहणार आहेत. आगे-आगे देखो क्या होता है? असं आहिर यांनी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्या राजीनाम्यावर देखील आहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्यावेळी बोललो होतो की शरद पवार हे महाविकास आघाडीचे कल्पतरू आहेत. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आजही मविआ टिकून आहे. आता आघाडी आणखी मजबूत झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभू्मीवर राणेंचा मोठा निर्णय; वातावरण पेटणार?
बारसू दौऱ्यावर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना आहिर यांनी उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूला जाणार आहेत. तेथील लोकांच्या समस्या समजून घेणार आहेत. आदित्यजी देखील पुण्यात चिपको आंदोलनासाठी जात आहेत. दोन्ही विषय पर्यावरणासाठी महत्त्वाचे असल्याचं आहिर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.