अंबड : सामाजिक बांधिलकी जपत प्रभागातील नागरिकांच्या आग्रहास्तव जन आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी ९ ते सायं ६ वाजेपर्यंत महादेव मंदिर,स्वामी नगर,अंबड येथे करण्यात आले आहे.
यामध्ये मोफत इसीजी,रक्तदाब,नेत्र तपासणी बरोबरच मधुमेह,मुतखडा,वंध्यत्व निवारण,बालरोग यासह विविध आजारांवर उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळ धाम गो सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
