पुणे, 7 एप्रिल : अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला जोरदार टोला लगावला आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या मतदारसंघात आता पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. यावर बोलताना त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले पवार?
गिरीश बापट यांचं निधन होऊन अवघे दोन दिवस झाले असतानाच पुण्यात भावी खासदार म्हणून भाजप नेते जगदिश मुळीक यांचे पोस्टर लागले होते. या पोस्टरची चर्चा झाल्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आले. यावरून अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला टोला लगावला आहे. कोणी गेलं तर तेरा दिवस थांबण्याची पद्धत असते. म्हणून आम्ही थांबलो होतो. पण काहींनी इतका उतावीळपणा दाखवला की तिथे अस्थि असताना खासदारकीची चर्चा झाली. ते मला आवडलं नाही असा टोला अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
उमेदवारांची चाचपणी
दरम्यान दुसरीकडे पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मविआकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलीधर मोहळ यांची नाव चर्चेत आहेत. तर दुसरीकडे मविआकडून रविंद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांचं नाव चर्चेत आहेत. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवाराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.