सिंधुदुर्ग, 23 मे : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंसोबत आता कोणी राहीलं नाही, जे उरलेत त्यांना खोटं सांगून थांबवलं आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आहारी गेले आहेत. त्यांना दर आठ दिवसांनी सिल्वर ओकच्या फेऱ्या माराव्या लागात असा टोला केसरकर यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अडीच वर्षात काय केलं हे सांगाव असा सवालही यावेळी केसरकर यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेबाबत भाजपच्या मिशन 150 वर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले केसरकर?
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 चा नारा देण्यात आला आहे. याबाबत दीपक केसरकर यांना विचारले असता भाजपच मिशन 150 हे आम्हाला धरून असेल असं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं लहान भाऊ, मोठा भाऊ सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी युती तोडली पण मुंबई महापालिकेत युतीचा महापौर होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्धव ठाकरेंचं ‘मिशन अंडरकवर’
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अंडरकवर मिशनची आखणी केली आहे. या मिशनंतर्गत उद्धव ठाकरे यांची माणंस तळागाळात जाऊन प्रचार करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री असताना जी काम केली आहेत, त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जाणार आहे. गावाच्या चावडी आणि पारावर जाऊन प्रचार करण्यात येणार आहे.
मात्र या मिशनचं वैशिष्ट म्हणजे ज्या व्यक्तिंवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहेत त्या व्यक्ती फक्त उद्धव ठाकरे यांनाच माहिती असणार आहेत. या मिशनपासून शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवलं जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.