मुंबई, 21 मे : आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. तीन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व संघटनेतील पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर आता मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संघटनात्मक बदलाची शक्यता
तीन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील उपस्थित होती. या बैठकीनंतर आता मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. ही बैठक आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीनंतर भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
भाजपचे मिशन दिडशे
भाजपकडून मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी मिशन दिडशेची आखणी करण्यात आली आहे. यातंर्गत मुंबई महापालिकेत दिडशे जागा जिंकून सत्ता मिळवण्याचं भाजपचं नियोजन आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजप युतीत लढण्याची शक्यता आहे. मात्र भाजप नेत्यांकडून मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, त्यासाठी बूथ लेव्हलचं नियोजन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीनंतर संघटनात्मक स्थरावर काही बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.