भुवनेश्वर 10 मे : पती आणि पत्नीचं नातं अतिशय खास असतं. मात्र, कधीकधी अतिशय छोट्या गोष्टींवरुन वाद होतात आणि ते अगदी टोकाला पोहोचतात. असंच एक प्रकरण ओडिसाच्या संबलपूर जिल्ह्यातून समोर आलं आहे. यात एका व्यक्तीने भात न बनवल्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. जामनकिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुआधी गावात रविवारी रात्री ही भीषण घटना घडली.
40 वर्षीय सनातन धारुआ असं आरोपीचं नाव असून गुन्ह्यातील पीडितेचं नाव पुष्पा धारुआ (35) असं आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत – एक मुलगा आणि एक मुलगी. पोलिसांनी सोमवारी या व्यक्तीला अटक केली.
प्रेमाचा भयानक अंत, त्याच्यासाठी कुटुंबाला सोडून राहिली, अखेर तिच्याच मृत्यूची बातमी आली
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘आरोपी सनातन रविवारी रात्री घरी आला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या पत्नीने भात नाही तर फक्त भाजी शिजवली आहे. यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार वादावादी झाली. वाद इतका वाढला की रागाच्या भरात सनातनने आपल्या पत्नीवर वार करून तिचा खून केला. दुर्दैवाने त्यांची दोन्ही मुले घरी नव्हती. मुलगी कुचिंदा ही घरकाम करते, तर मुलगा त्या रात्री मित्राच्या घरी झोपला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
मृत महिलेचा मुलगा घरी परतल्यावर ही बाब उघडकीस आली. त्याला त्याची आई मृत दिसली. यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पतीला अटक केली. जामनकिरा पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक प्रेमजीत दास यांनी सांगितलं की, सोमवारी शवविच्छेदन करण्यात आलं. महिलांवरील सर्वात जास्त नोंदवलेले गुन्हे हे घरगुती हिंसाचाराचे असल्याची माहिती आहे. 2022 मध्ये महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या 6,900 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली. कोविड-19 महामारीनंतर भारतातही घरगुती हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.