नवी दिल्ली, 25 मार्च : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने आणखी एक गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. 81 किलो वजनी गटामध्ये स्विटी बोराने गोल्डन पंच लगावला आहे. स्विटीने 4-3 ने सामना जिंकला आहे. स्विटीने चीनच्या बॉक्सरला धूळ चारत गोल्ड मेडल पटकावले आहे.
नीतू घंघासने पाठोपाठ स्विटी बोराने सुद्धा गोल्डन कामगिरी करून आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लीना हिला हरवून स्विटीने गोल्ड मेडल पटकावले आहे. स्विटीने हा सामना 4-3 अशा फरकाने जिंकला. स्विटीने पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सरवर आपलं वर्चस्व राखलं होतं. पहिल्या फेरीतच तिने जोरदार पंच लगावत देशी हिसका दाखवला होता. पहिली फेरी 3-2 अशी जिंकली.
SAWEETY BOORA beat Lina Wang of China in the FINAL #WorldChampionships #WWCHDelhi #Boxing #WBC2023 #WBC @saweetyboora @BFI_official @Media_SAI @kheloindia pic.twitter.com/TUHqBhfUvf
— Doordarshan Sports (@ddsportschannel) March 25, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.