अहमदाबाद, 02 एप्रिल : भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलीम दुर्राणी हे कर्करोगाने त्रस्त होते. क्रिकेटमध्ये ७०-८० च्या दशकात दुर्राणी यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ओळख निर्माण केली. त्यांनी १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई कसोटीत पदार्पण केलं होतं. आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठीही दुर्राणी ओळखले जात होते.
दुर्राणी असे पहिले भारतीय क्रिकेटर होते त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यत आलं होतं. १९६० मध्ये क्रिकेटमधील योगदानासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. भारताकडून त्यांनी एकूण २९ कसोटी सामने खेळले होते. यात त्यांनी १२०२ धावा करताना १ शतक आणि ७ अर्धशतके केली होती. याशिवाय ७५ विकेटही घेतल्या होत्या.
IPL 2023 : रोहित शर्मा आज खेळणार का? प्रशिक्षक बाऊचर यांनी दिली माहिती
अफगाणिस्तानमध्ये जन्म, पाकिस्तानमध्ये स्थलांतर
अष्टपैलू क्रिकेटर सलीम दुर्राणी यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये ११ डिसेंबर १९३४ रोजी झाला होता. काबुलमध्ये जन्मलेले दुर्राणी फक्त ८ महिन्यांचे असताना कुटुंब पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. कराचीत राहत असताना भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंबिय भारतात आले.
क्रिकेटनंतर चित्रपटसृष्टीतही काम
सलीम दुर्राणी यांनी शेवटचा कसोटी सामना १९७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्याच वर्षी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. दुर्राणी यांनी चित्रपटसृष्टीतही नशीब अजमावलं होतं. सलीम यांनी चरित्र या चित्रपटात परवीन बॉबीसोबत काम केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.