लंडन, 08 एप्रिल : भारतातील कोहिनूर हिरा लंडनमध्ये आहे, हे तुम्हाला माहीत असेलच, पण पाच वर्षांपूर्वी बकिंगहॅम पॅलेसने तत्कालीन प्रिन्स चार्ल्स यांचा 70 वा वाढदिवस त्यांच्या आवडत्या शाही दागिन्यांचे प्रदर्शनासह साजरा केला होता. या प्रदर्शनात ब्रिटिशांनी भारतातून लुटलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. मूर्ती, पेंटिंग्ज व्यतिरिक्त, 19 पन्ना रत्नांनी जडलेला एक लांब सोन्याचा कंबरपट्टा देखील होता. एका भारतीय राजाने त्याचा घोडा सजवण्यासाठी त्याचा वापर केला होता. या प्रदर्शनानंतर ब्रिटनच्या राजघराण्यावर जोरदार टीका झाली होती. त्याचा संबंध ब्रिटनच्या हिंसक भूतकाळाशी होता. असं असलं तरी, ब्रिटिश राजघराण्याला आपल्या भूतकाळाचा अभिमान आहे.
111 वर्षे जुन्या रिपोर्टमधून झाला खुलासा
‘द गार्डियन’ने नुकतीच भारतीय उपखंडावर ब्रिटनच्या राजवटीसाठी जबाबदार असलेल्या सरकारी इंडिया ऑफिसच्या अभिलेखागारातून 46 पानांची फाइल शोधून काढली आहे. यात क्वीन मेरीच्या आदेशाचा संदर्भ आहे. ज्यामध्ये तिला ब्रिटिश राजघराण्याला मिळालेल्या दागिन्यांच्या उत्पत्तीची चौकशी झाली होती. 1912 च्या या रिपोर्टमध्ये चार्ल्सच्या एमराल्ड बेल्टसह मौल्यवान दागिने विजयाचे प्रतीक म्हणून भारतातून ब्रिटनमध्ये कसे नेले गेले याचे वर्णन केले आहे. नंतर ते राणी व्हिक्टोरियाला सोपवले गेले. त्या वस्तू आता ब्रिटिश राजघराण्याची मालमत्ता म्हणून राजाच्या मालकीच्या आहेत.
टीव्हीवर हवं ते पाहण्यावर बंदी, इतर बातम्या पाहिल्यास होते शिक्षा; विचित्र नियम असलेला देश
महाराजा रणजितसिंहांच्या भेटीसाठी गेले होते गव्हर्नर जनरल
1837 मध्ये सोसायटी डायरिस्ट फॅनी ईडन आणि त्यांचा भाऊ जॉर्ज यांच्या पंजाब भेटीचा उल्लेख रिपोर्टमध्ये आहे. ब्रिटिश राजवटीत जॉर्ज हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यांनी लाहोरमध्ये महाराजा रणजितसिंह यांची भेट घेतली होती, त्यांनी सहा वर्षांपूर्वी ब्रिटिशांशी मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली होती. ईडन यांनी आपल्या अहवालात लिहिले होते की अंध झालेले महाराजा रणजितसिंह यांनी फारच कमी मौल्यवान रत्ने परिधान केली होती, परंतु त्यांचा संघ मौल्यवान रत्नांनी सजलेला होता. महाराजांकडे इतकी रत्ने होती की त्यांनी आपले घोडे एकापेक्षा एक मौल्यवान रत्नांनी सजवले होते. त्यांच्या आलिशान निवासाच्या भव्यतेची आणि सजावटीची तुम्ही कल्पना करू शकत नाही. फॅनी ईडनने नंतर त्यांच्या डायरीत लिहिले की “जर कधी आम्हाला हे राज्य लुटण्याची परवानगी मिळाली तर मी थेट त्यांच्या तबेल्यात जाईन”.
महाराजा रणजितसिंह यांच्या मुलाकडून लुटला कोहिनूर
या घटनेनंतर 12 वर्षांनी महाराजा रणजितसिंह यांचा धाकटा मुलगा आणि वारस दलीपसिंह याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विजयी सैन्यासमोर पंजाबच्या विलिनीकरणाबद्दल स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. या पराभवाचा परिणाम म्हणून त्यांना घोड्यांसह पन्ना जडलेला पट्टा आणि सर्वांत मौल्यवान कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन करावा लागला होता. तो कोहिनूर हिरा लंडनच्या टॉवरवर राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात प्रदर्शित करण्यात आला आहे. आज हा हिरा राजेशाही इतिहासासोबतच ब्रिटनच्या जुलमी इतिहासाचे प्रतीक बनला आहे.
जगातलं असं गाव जिथे रस्तेच नाहीत, कार-बाइक्सऐवजी बोटीने प्रवास करतात लोक
किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात दिसणार नाही कोहिनूर
बकिंगहॅम पॅलेसला भारतातून लुटून नेलेल्या कलाकृतींच्या संवेदनशीलतेची स्पष्ट जाणीव आहे. भारत सरकारने ब्रिटनला असेही सांगितले आहे की किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राणी कॅमिला यांना कोहिनूर जडलेला मुकुट घातल्याने भूतकाळातील वेदनादायक आठवणी जाग्या होतील. त्यानंतर राजवाड्याने कोहिनूरच्या जागी दुसरा हिरा लावणार असल्याचे जाहीर केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.