मुंबई, 11 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल असे वाटत होते. परंतु यंदा देखील अर्जुनची ही संधी हुकली असून त्याच्या ऐवजी यश धुलची आयपीएल 2023 मध्ये एंट्री झाली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर आज मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज यश धुल याला या सामन्यात प्लेयिंग 11 मध्ये संधी मिळावी असून या सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पदार्पणाचा सामना ठरला आहे. यश धुल हा अवघा 20 वर्षांचा असून त्याने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप देखील जिंकला होता. यश धुलहा राष्ट्रीय पातळीवर दिल्ली संघाकडून खेळतो.
DC’s brightest 🌟 is all set for his IPL Debut 💙
Go well, Yash 💪#YehHaiNayiDilli #IPL2023 #MIvDC pic.twitter.com/iPMWRXGzA1
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 11, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.