राज्यातील वीज भारनियमन आणि महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्यामध्ये महत्वाची बैठक आज पार पडली. ही बैठक तब्बल अडीच तास सुरु होती. या बैठकीदरम्यान नितिन राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, राज्यात उन्हाचा उच्चांक वाढतोय, कोळसा उपल्बध असेल तर रॅक मिळत नाहीत. कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील वीच टंचाई कसा मुकाबला करणार, १५ टक्के तुट आहे. महावितरण आणि महाजनको प्रेझेंटेशन दिलं असल्याचं ते म्हणाले.
तसंच महाजनको ८ हजार मेगावॉट वीज राज्याला देईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाजनको ८ हजार मेगावॅट वीज निर्मिती करून देईल, दररोज कोळसा आणायला ३७ रॅक लागतात त्याचं शोर्टेज झालं आहे. ४० हजार मेट्रिक टन शोर्टफॉल आहे. जी तूट आहे ती भरून काढायला प्रयत्न करत आहोत. एकंदरीत २००० मेगा वाट तूट आहे. आम्ही बाजारातून घेतो, त्यासाठी भांडवल लागतं. इतर राज्यांमध्ये लोडशेडिंग राज्यात मागील पाच सहा दिवस लोडशेडींग होऊ दिलं नाही. गुजरात आंध्र प्रदेश मध्ये हरियाणा पंजाब मध्ये वीज कट लावली आहे. बारा राज्यात वीज टंचाई आहे.
मुख्यमंत्र्यांना आर्थिक बाजू समजावून सांगितली त्यांना ती पटली आहे. केंद्राने जी योजना काढली त्यानुसार राज्याला सबसिडी दिला जातो. तो निधी दिला तर योजनेला मान्यता मिळेल. अंदाजे आम्हाला निधी हवा होता. माझं गाऱ्हाणे मांडले मुख्यमंत्री ऐकतील असा विश्वास आहे असही ते म्हणाले. कोळसा उत्पादन आणि रेल्वे रॅकच नियोजन नाही. तफावत आहे. १ लाख ३८ हजारावर टन कोळसा आम्हाला हवा १ लाख १७ हजार कोळसा मिळतो. जो कमी मिळतो त्यानुसार नियोजन करावे लागते त्यामुळे उत्पादन फरक पडतो. असही ते म्हणाले. तसंच केंद्राने आयात कोळसा बंद केली होती आता ती उठवली आहे. त्या आधी आम्ही खरेदी साठी तयारी केली आहे. मे जून वीज मागणी बघितली आहे. तज्ञांची मतं मागितले आहेत. आम्ही जिल्हा पातळीवर कंट्रोल रूम सुरू केली आहे. महाजनको पहिल्यांदा भाजप काळात नुकसानित होती. आता ३७२ कोटी प्रॉफिट मध्ये आहे. एक लाख मेट्रिक टन कोळसा आम्ही आयत करणार आहोत टेंडर काढले आहेत लवकर खरेदी करू असंही उर्जा मंत्र्यांनी सांगितलं.