दिल्ली, 07 मे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि रनमशिन विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे चर्चेत आहे. आरसीबीकडून खेळताना विराटने यंदाच्या हंगामात 10 सामन्यात 419 धावा केल्या आहेत. यात 6 अर्धशतकांचाही समावेश आहे. फलंदाजीशिवाय मैदानावर खेळाडूंसोबत झालेल्या वादाचीही जोरदार चर्चा यंदाच्या आयपीएलमध्ये रंगली आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात विराटचा नवीन आणि गौतम गंभीर यांच्याशी वाद झाला होता.
विराट कोहली जेव्हा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्याचं वेगळं रूप बघायला मिळालं. सामन्याआधी विराट कोहली त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांना भेटला. राजकुमार शर्मा यांना पाहताच विराट कोहलीने त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. त्यानंतर विराट कोहली त्यांच्याशी बराच वेळ बोलत होता. विराट कोहलीच्या या कृतीने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली.
विराट कोहली त्याच्या फलंदाजीशिवाय आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो. सहकारी खेळाडूंवर तो भडकल्याचं याआधीही अनेकदा दिसून आलंय. यावरून त्याच्यावर टीकाही केली गेलीय. पण ज्या पद्धतीने त्यानं लहानपणीच्या प्रशिक्षकांची भेट घेतली त्यातून त्यानं टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं असल्याचंही त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय.
A wholesome meet & greet @imVkohli catches up with his childhood coach #TATAIPL | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/YHifXeN6PE
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.