बंगळुरू, 11 एप्रिल : आरसीबीविरुद्धच्या सामन्यात लखनऊने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात शेवटच्या षटकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. लखनऊने शेवटच्या चेंडूवर एक गडी राखून विजय मिळवला. दोन्ही संघांकडून मिळून या सामन्यात पाच अर्धशतके झाली. पण अखेरच्या चेंडूवर जे घडलं त्यावरून वाद सुरू झाला आहे. मंकडिंग पद्धतीने धावबाद करण्याच्या नियमावरून आतापर्यंत अनेकदा वाद झाले आहेत. आरसीबीच्या हर्षल पटेलने अखेरच्या चेंडूवर रवी बिश्नोईला मंकडिंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
२० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लखनऊला विजयासाठी एक धाव हवी होती. तेव्हा नॉन स्ट्रायकर एंडला रवी बिश्नोई होता आणि स्ट्राइकवर आवेश खान. गोलंदाजी हर्षल पटेल करत होता. रवी बिश्नोईला नॉन स्ट्राइक एंडला बाद करण्याचा प्रयत्न हर्षल पटेलने केला. रवी बिश्नोई क्रीजमधून पुढे गेला तेव्हा चेंडू स्टम्पवर मारायला हवा होता पण तो बसला नाही. त्यानंतर पुढे जाऊन स्टम्पवर थ्रो केला.
Thought’s Harsha?
Umpires discretion.. 6 penalty runs if obviously trying to gain unfair advantage by leaving crease early?
Would stop batters doing it without all the controversy https://t.co/xjK7Bnw0PS
— Ben Stokes (@benstokes38) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.