मुंबई, 11 मे : राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत आज मोठी घडामोड घडली आहे. सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. तर उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान हा निर्णय आता अध्यक्षांकडे गेल्यानं शिंदे सरकार बचावलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सूचक वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिंदे गटातील अनेक इच्छूक आमदारांचे डोळे हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये राज्याच्या सत्तासंर्घषाचा खटला चालू असल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं बोललं जात होतं. मात्र आता न्यायालयानं या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हे प्रकरण न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेणार आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शिंदे गटासाठी दिलासा
हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे बोलत होते. तेव्हा त्यांच्या शेजारी आमदार संजय शिरसाट बसले होते. सजंय शिरसाट देखील मंत्रिपदासाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे.
शहाजीबापूंचे सूचक वक्तव्य
दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू यांनी देखील त्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिल्याने विधिमंडळाचा सन्मान राखला गेला. आता सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकाळा झाल्याचं शाहाजीबापू यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.