अनुज गौतम, प्रतिनिधी
सागर, 1 मे : मध्यप्रदेशच्या बहरिया येथील बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या व्यासपीठावरुन 95 जण सनातन धर्मात परतले आहेत. असे सांगितले जात आहे की, त्यांना मच्छरदाणी आणि बकरीचे आमिष दाखवून ख्रिश्चन बनवले गेले होते. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भागवत कथेच्या मंचावरून आईवडिलांची शपथ देऊन त्यांना हिंदू धर्मात परत आणले. तसेच यावेळी या सर्व लोकांना त्यांनी पिवळा स्कार्फ बांधून टिळक लावण्यात आला आणि जय श्री रामचा जयघोष करण्यात आला.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, 2 दिवसांपूर्वी त्यांनी सागर जिल्ह्यात काहीतरी मोठे घडणार आहे, असे सांगितले होते. त्यामुळे बालाजी, हनुमानजी महाराजांच्या प्रेरणेने काही लोकांचे हृदयपरिवर्तन झाले आहे आणि हृदयपरिवर्तनामुळे या लोक सनातनकडे परतले. ते काही लोकांच्या लोभामुळे भरकटले होते.
धर्मात परतलेला रामदयाल म्हणाला, ‘ख्रिश्चन लोकांद्वारे, मच्छरदाणी, बकऱ्या आणि मुलांना लिहायला शिकवण्यासह इतर प्रकारचे लोभ दिले जाते. राजघाटात डुबकी मारली आणि चर्चला बोलावू लागले होते, पण आता तुमची श्रीमद्भागवत कथा ऐकली तर लक्षात आले की आम्ही जे केले ते चुकीचे आहे, म्हणून हिंदू धर्मात परत यायचे होते. मग काही लोकांशी संपर्क साधला, ज्यांनी आम्हाला तुमच्याकडे नेले’.
या लोकांपैकी गुलाब राणीने सांगितले की, ती बदौना गावची रहिवासी आहे, तिचे राजघाटावर डुबकी लावली आणि नंतर तिला सांगितले गेले की, तिच्या घरातील देवतांचे फोटो वेगळे करा, बिंदी घालणे आणि मंगळसूत्र घालणे बंद करा. आता तुमचा आशीर्वाद मिळाला आहे, आता आम्ही कुठेही जाणार नाही, कोणाच्याही लोभाला पडणार नाही, असे ती म्हणाली. तर येथे कथेच्या शेवटच्या दिवशी 50 कुटुंबातील एकूण 95 लोक सनातन धर्मात परतले आहेत.
यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मंचावरून हिंदू सनातन धर्मात परतणाऱ्यांशी संवाद साधला. भविष्यात काही मोठे प्रलोभन आले तर तुम्ही पुन्हा दूर जाल का?, असे धीरेंद्र शास्त्री यांनी विचारले. तर तुमच्याकडून प्रेरीत होऊन सनातन धर्मात आलो आणि कधीही परत जाणार नाही, असे लोक म्हणाले. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी हिंदूंचे विघटन होऊ देणार नाही. दरम्यान, यावेळी कथेला उपस्थित हजारो लोकांनी जय श्री रामचा जयघोष केला. मागील 7 दिवसांपासून सागरच्या बहेरीया येथे कथेचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.