मुंबई, 6 मे : आयपीएल 2023 मध्ये 49 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नई सुपरकिंग्सच्या विजयात युवा गोलंदाज मथीशा पथिरानाचा मोठा वाटा होता. मथीशाने या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या तब्बल 3 विकेट्स घेतल्या त्यामुळे मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक लावण्यात यश मिळाले. परंतु तिसरी विकेट घेतल्यानंतर मथीशा पथिरानाने मैदानात एक वेगळीच अॅक्शन केली जी पाहून सर्वांनाच तो नक्की काय करत होता? असा प्रश्न पडला.
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात चेन्नईच्या भेदक गोलंदाजी समोर मुंबईच्या अनेक स्टार फलंदाजांची विकेट पडली. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या तब्बल 8 विकेट मिळवून त्यांना 139 धावांवर रोखले. चेन्नईकडून सर्वाधिक तीन विकेट युवा गोलंदाज माथेशा पाथीरनने घेतल्या तर दीपक चहर आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी 2, तर रवींद्र जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आले.
I’m die hard fan of Cristiano Ronaldo, and modeled my celebration after him
– Matheesha Pathirana #WhistlePodu #IPL2023 #CSK pic.twitter.com/nibx2KwO8s
— ιʝαყ (@_VijayPandian) May 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.