पुणे, 9 मे, रायचंद शिंदे : जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीनं नदीपात्रात शेकडो मृत कोंबड्या फेकल्यानं परीसरात दुर्गंधी पसरली आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव-वारुळवाडी हद्दीतल्या पुलावरून मीना नदीपात्रात मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून अंदाजे 500 कोंबड्या फेकण्यात आल्या. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे या पुलापासून जवळच पोलीस स्टेशन देखील आहे. मात्र तरी देखील या मृत कोंबड्या नदीपात्रात फेकण्यात आल्या आहेत.
रोगराई पसरण्याची शक्यता
अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्रीच्या सुमारास शेकडो मृत कोंबड्या पुलावरून नदीपात्रात फेकल्या. या मृत कोंबड्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अनेक नागरिक आणि शाळकरी मुले या ठिकानावरून ये-जा करत असतात. या प्रकारामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कोंबड्या कोणी टाकल्या हे अद्याप समोर आलेलं नाही. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
सीसीटीव्ही लावण्यात आल्याचा दावा
दरम्यान हा पूल दोन गावांच्या हद्दीत येतो. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याता आल्याचा दावा दोन्ही गावाच्या ग्रामपंचायतींकडून करण्यात आला आहे. या पुलापासून काही अंतारावरच पोलीस स्टेशन देखील आहे. तरी देखील हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.