रायबरेली, 15 मे : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका घरात चक्क सापांनी तळ ठोकल्याचे पाहायला मिळाले. अचानक घरातून असंख्य साप बाहेर पडल्याने मालकाच्या हादराच बसला. सध्या रात्रीच्या अंधारात अचानक साप कुठून येतात हे घर मालकालाही समजत नाही. त्यामुळे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सरेणी पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. येथील राम गावातील रहिवासी रिजवान मोहम्मद हा मध्यरात्री शौचास जाण्यासाठी उठला तेव्हा तो चक्रावून गेला. त्याच्या खोलीत छोटे-मोठे साप इकडे तिकडे रांगत होते. यामुळे घाबरुन रिझवान ओरडू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील इतर सदस्य तेथे पोहोचले आणि त्यांनी सापांना काठीने मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही साप मारले गेले, तर अनेकांनी रेंगाळत पळ काढला.
रात्रीच्या अंधारात अचानक 100 ते 150 साप कुठून दिसले, हे सध्या कोणालाच समजलेले नाही. आजूबाजूच्या वस्तीत अचानक साप दिसल्याने घरमालकासह परिसरात घबराटीचे वातावरण आहे. इतके साप कोठून आणि का बाहेर पडले, हे कोणालाच समजत नाही आहे.
सरेनी येथील राम गावातील रहिवासी असलेल्या रिजवानचे घर गावाच्या मधोमध असून, रात्री उशिरा घरातून साप बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू होताच, त्याच्या शेजारी राहणारे लोकही घाबरले आणि त्यांच्यातही घबराट पसरली. घरमालक रिजवानने सांगितले की, त्याने अनेक साप मारले आहेत, पण सापांचे हे प्रमाण संपतच नव्हतं. त्यामुळे मग त्याने याबाबतची माहिती वनविभागाला दिली. मात्र, सकाळपासून साप बाहेर येणे बंद झाले. दुसरीकडे वनविभागाचा एकही अधिकारी आणि कर्मचारी आला नाही. त्यामुळे त्या लोकांना रात्र कशीतरी काढावी लागली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.