नवी दिल्ली 20 एप्रिल : सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडिओ समोर येतात, जे पाहून हसू आवरत नाही. हे व्हिडिओ अनेकदा अपघात किंवा स्टंटशी संबंधित असतात. आजकाल बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्यामुळे अनेक आश्चर्यकारक घटनांचे व्हिडिओ ऑनलाइन पाहायला मिळतात. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रस्ते अपघातही कैद होतात, त्यातील काही अपघात इतके भीषण असतात, जे पाहूनच थरकाप उडतो. सध्या अपघाताचा एक अजब व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये दुचाकी आणि घोड्याची धडक होते. यात दुचाकीस्वार आणि घोडेस्वार दोघेही जखमी होतात. मध्य प्रदेशातील देवासमध्ये झालेल्या एका रस्ता अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून कोणीही घाबरून जाईल. हा व्हिडिओ मध्यरात्रीचा आहे, जेव्हा रस्त्यावर वाहनांची फार कमी वर्दळ असते. दरम्यान, घोड्यावर बसलेला एक माणूस रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो, तो समोर असलेली कार निघून जाण्याची वाट बघत असतो. तिथून गाडी पुढे जाताच, घोडेस्वार पुन्हा रस्ता ओलांडू लागतो. तेवढ्यात दुरून एक वेगवान दुचाकी येताना दिसते आणि घोड्याला जोरात धडकते.
collision between #bike and #horse#देवास #Dewas #MadhyaPradesh #viralvideo #Trending #accidente pic.twitter.com/XMlllAO0VP
— SuVidha (@IamSuVidha) April 20, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.