राज्य सरकारने केळी पिकाचा फळबाग योजनेत समावेश केल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे.
या निर्णयामुळे आंतरमशागतीसाठी हेक्टरी एक ते दीड लाख पर्यंत अनुदान मिळू शकते.तसेच वाढीव कर्ज देखील मिळू शकते,रोजगार हमी योजनेतून इतर फळबागांसाठी दिला जाणारा निधी यापुढे केळी उत्पादकांना देखील मिळेल.
शासनाकडून आंबा,लिंबू,मोसंबी या सारख्या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीहेक्टरी अनुदान दिले जाते.तसेच खड्डे खोदण्यापासून ते लागवडीपर्यंतचा सर्व खर्च व देखभालीसाठी रोजगार हमी योजनेतील दराप्रमाणे मजुरी दिली जाते ती यापुढे केळी पिकाला देखील दिली जाणार आहे.