पुणे, 12 एप्रिल : मनसेच्या नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेससोबतची जवळीक पुन्हा एकदा दिसून आली आहे. पुण्यात विकासकामांच्या पाहणीसाठी आलेल्या सुप्रिया सुळेंसोबत मनसे नेते वसंत मोरे दिसून आलेत. दरम्यान त्यांनी सुप्रिया सुळेंच्या वाहनातूनही प्रवास केला. मात्र, यानंतर सुप्रिया सुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय. वसंत मोरे सतत विकासकामांसाठी मदत करत असतात. विकासकामांबाबत आमच्यात कोणतेही मदतभेद नसल्याचं, सुप्रिया सुळेंनी म्हणलं आहे.
याआधीही वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा वसंत मोरे सुप्रिया सुळेंसोबत दिसल्यानं राजकीय वर्तुळात मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाहीत ना अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
वसंत मोरे हे मागच्या काही दिवसांपासून मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा काढला, तेव्हा वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. यानंतर मनसेच्या पुण्यातल्या स्थानिक राजकारणाबाबतही वसंत मोरे यांनी अनेकवेळा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. तर अजित पवार यांनीही वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.