धाराशिव, 7 एप्रिल : धाराशिवमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. हा मनसेसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. प्रशांत नवगिरे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे धाराशिवमध्ये मनसेत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नवगिरे यांनी काही काळ महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेच्या उपाध्यक्षपदाची देखील जबाबदारी सांभाळली होती.
मनसेला खिंडार
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखरराव हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं नशीब अजमावून पहात आहेत. के. चंद्रशेखरराव यांनी महाराष्ट्रात विशेष: मराठवाड्यात सभांचा धडाका लावला आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश देखील केला आहे. आता भारत राष्ट्र समितीने धाराशिवमध्ये मनसेला खिंडार पाडलं आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.
शरद पवारांचं राजीनामा नाट्य कशासाठी? भाजपच्या गौप्यस्फोटांनं खळबळ
गेल्या 28 वर्षांपासून राज ठाकरेंसोबत
राज ठाकरेंचे निकटवर्तीय अशी प्रशांत नवगिरे यांची ओळख आहे. ते गेले 28 वर्ष भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांच्याकडे मनसेने विविध पदांची जबाबदारी सोपावली होती. सध्या ते मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मात्र आता नवगिरे यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केल्यानं धाराशिवमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.