मुंबई, 20 मे : प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला गुरू म्हणजे आई…आई एवढं निस्वार्थी प्रेम कुणीच करू शकत नाही. आज मातृदिनानिमित्त खास गाण्याची भेट दिली आहे. लोकप्रिय गायक, संगीतकार जशन भुमकर यांनी मदर्स डेच्या दिवशी ‘ती एकटी चांदनी’ हे गाण रिलीज केलं आहे.
जशन भुमकर यांनी आपल्या गाण्यातून खास आईसाठी एक भावपूर्ण गाणं सादर केलं आहे. या गाण्यातून आपण आईबद्दल भावना व्यक्त करू शकतो. या जगात आईही आपल्या लेकरासाठी सर्वकाही असते. मातृदिनाच्या दिवशी भुमकर यांनी खास गाणं सादर करण्यामागे आपली भावना व्यक्त केली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
(‘तिच्यासारखं 50 % सौंदर्य मला मिळालं असतं तर?’ हेमांगी कवीची आईसाठी खास पोस्ट)
“ती एकटी चांदनी” हे जगातलं सर्वात सुंदर असं गाणं आईसाठी तयार केले आहे, ही एका प्रकारे आदरांजली आहे. जर संपूर्ण जगात कुणी आपल्या लेकरासाठी निस्वार्थ भावानेनं प्रेम करत असेल तर ही आई असते. आपण किती ही मोठे झालो, नोकरी मिळवली, मोठ्या स्थानावरही गेलो तरी आपल्या आईने आपल्यासाठी जे काही केलं, त्याचा परतावा तुम्ही कधीच देऊ शकत नाही. माझी आई प्रियंवदा भूमकर यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली. त्यांनी एक उद्योजक आणि आई म्हणून आपली भूमिका यशस्वीपणे मांडली. त्यांनी मला काम आणि घरात मला पायावर उभं राहण्यास सक्षम बनवलं. हे गाणं मी आपल्या जन्मदात्यांसाठी तयार केलं आहे. हे गाणं सर्व रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास भुमकर यांनी व्यक्त केला.
‘ती एकटी चांदनी’ हे गाणं जशन भुमकर यांनी लिहिलं आहे. या गाण्याला संगीत जगदीश भांगडे आणि मितेश चिंदारकर यांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.