विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 27 एप्रिल : ट्रिपला गेलेलं असताना मैत्री केली आणि या मैत्रीचा गैरफायदा घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. फिरायला गेलेल्या लोकांशी मैत्री करून नंतर त्यांचे मोबाईल चोरून खात्यात पैसे ट्रान्सफर करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोप अनुराग ठाकूर हा 21 वर्षांचा असून तो नागपूरचा रहिवासी आहे. आरोपीकडून आयफोन 14 प्रो आणि 70 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
काश्मीर आणि कुलू मनालीला जात असताना अनुराग ठाकूरशी मैत्री केल्याची तक्रार फिर्यादीने बोरिवली पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिरत असताना अनुरागने मोबाईल आणि पिनची माहिती घेतली. काही दिवसांनी आरोपी मुंबईत आला. शहरात आपलं कोणीही ओळखीचं नसल्याचं त्याने सांगितलं, त्यामुळे तक्रारदाराने अनुरागला घरी राहायला दिलं.
तुमच्या शहरातून (मुंबई)
घरी राहायला आल्यानंतर अनुरागने संधी साधली आणि फिर्यादीची फोन चोरून त्यातून 80 हजार रुपये ट्रान्सफर केले. तक्रारीनंतर आरोपीला बोरिवली पोलिसांनी नागपूरमधून अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.