मुंबई, 24 एप्रिल : शाहरुख खानच्या एका झलकसाठी त्याच्या ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची गर्दी नेहमीच जमते. पण, तुम्हाला स्वतःला त्याच्या आलिशान घरात जाण्याची आणि शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्याची संधी मिळाली तर? आनंदाने किंचाळणार की फक्त स्वप्न समजून ते जगणार. नुकतीच ही उत्तम संधी मॉडेल नवप्रीत कौरला मिळाली, जिने शाहरुख खानच्या घरी जाण्याचा आणि कुटुंबियांना भेटण्याचा तिचा अनुभव सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केला आहे. शाहरुखसोबतचा सेल्फी शेअर करताना तिने आपला आनंद व्यक्त केला आहे.
नवप्रीत म्हणते की, ‘शाहरुखला भेटणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. नवप्रीतने मन्नतमध्ये तिला कशी वागणूक मिळाली ते सांगितलं. शाहरुखने तिच्यासाठी पिझ्झा बनवला आणि अबरामने तिला नॅपकिनवर ऑटोग्राफ दिला. नवप्रीतने आपल्या पोस्टमध्ये संपूर्ण खान कुटुंब आणि त्यांच्या वागण्याबद्दल सांगितले आहे. यासोबतच ही आठवण नेहमी सोबत ठेवू असंही त्यांनी म्हटलं आहे.
नवप्रीतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले- ‘मी स्वतःला वचन दिले होते की मी हे कधीही पोस्ट करणार नाही, परंतु ही आठवण माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. मन्नतमधील दिवस माझ्यासाठी खूपच खास होता. किंग, शाहरुख खानने स्वतः माझ्यासाठी पिझ्झा बनवला, तोही व्हेज, कारण काही पंजाबी व्हेजही आहेत. जोपर्यंत मी त्याच्या घरी होते, तोपर्यंत मला सतत असे वाटत होते की मी स्वप्न पाहत आहे आणि लवकरच कोणीतरी येऊन मला जागे करेल. पण, मी स्वत:ला शांत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मला आनंदाने उड्या माराव्या वाटल्या.’
‘मी खान कुटुंबियांसोबत जेवणाच्या टेबलावर बसले होते. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी ही आमच्यासोबत होती. मी वॉशरूमचा रस्ता विचारल्यावर शाहरुख खुर्चीवरून उठला आणि मला स्वतः वॉशरूममध्ये घेऊन गेला. त्या क्षणी मी आत जाऊन अक्षरशः किंचाळलेच. मी वॉशरूममध्ये गेले आणि ओरडले पण आवाज न करता. मग डायनिंग टेबलवर येऊन पिझ्झाचे स्लाईस खाल्ले.’
नवप्रीतने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, ‘गौरी खान देखील खुप चांगली आहे. अबराम माझा नवीन चांगला मित्र बनला आहे. मला माहित आहे की काही दिवसांनी त्याला मी लक्षात राहणार नाही. आर्यन देखील एक जेंटलमन आहे. तो रागावलेला दिसतो आणि सुहाना खूप क्यूट आहे. पूजा स्वत: मध्ये आयकॉनिक आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी शाहरुख खानच्या घरी मन्नतला गेले होते. आत्तापर्यंत ते मला स्वप्नवत वाटत होतं.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.