मुंबई, 16 मे : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘हे सरकार बेकायदेशीर आहे, यांचा आदेश पाळू नका’ असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टानं राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. ठाकरे सरकारचा पोपट कधीच मेला आहे, मात्र ते जाहीर करत नाहीत. कारण तसं जाहीर केलं तर पक्षात माणसं शिल्लक राहणार नाहीत, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. संजय रऊत यांनी फडणवीसांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊतांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला वाटत होतं, शिंदे सरकारमध्ये एकमेव शहाणे व्यक्ती आहेत ते म्हणजे फडणवीस. मात्र आता फडणवीसच असे बोलायला लागल्यावर काय बोलणार. शिंदे गटाचा पोपट मेला आहे, आता फक्त नार्वेकरांकडून जाहीर करणं बाकी असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.