मुंबई : कर्नाटक निवडणुकीसाधी प्रचाराची रणधुमाळी रंगात आली आहे. प्रचारसभा जोरदार चालू आहे. मात्र यादरम्यान काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये संतापाचं वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करताना काँग्रेस नेत्यांची जीभ घसरणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र आता मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली. एका सभेदरम्यान बोलताना त्यांनी त्यांची तुलना विषारी सापाशी केली. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते यानंतर आक्रमक झाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘विषारी साप’ वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कलबुर्गी इथे गुरुवारी (२७ एप्रिल) जाहीर सभेत खर्गे यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ‘विषारी साप’शी केली. यानंतर भाजपने मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनेही केली.
Karnataka Election : प्रियांका गांधी पोहोचल्या किचनमध्ये, मस्त बनवला डोसा, पण झालं उलटच VIDEO
पुढे खर्गे म्हणाले तुम्ही त्याला हात लावून पाहा तुम्हाला समजेल. विषारी सापाला हात लावल्यानंतर काय होऊ शकतं याची कल्पना येईल. स्पर्श केला तर जीवानीशी जाल. एकदा विषाची चव तुम्ही घेतली की तुम्ही कायम स्वरुपी झोपी जाल असंही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
देशाच्या या कोपऱ्यात लोकांची सावली झाली गायब, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
काँग्रेस प्रमुखांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या प्रकारचे विष ओकत आहेत हे देश पाहत आहे. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
टीका करून त्यांनी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. हे विष गांधी घरण्यातून ओतलं जात आहे असंही यावेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या. स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, मल्लिकार्जुन खरगे यांचे विधान हे पंतप्रधानांबद्दल गांधी कुटुंबीयांना काय वाटते याचे प्रतिबिंब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.