मुंबई, 3 एप्रिल : छत्रपती संभाजीनगरात रविवारी महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेमधून विरोधकांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. मात्र ही सभा एका वेगळ्याच कारणाणे चर्चेत आली, ती म्हणजे या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दांडी मारली. नाना पटोले सभेला गैरहजर असल्यानं चर्चेला उधाण आलं. आता यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले आजारी असल्यामुळे या सेभेला गैरहजर राहिले, मात्र पुढच्या सभेला ते नक्की उपस्थित असतील असं राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं राऊत यांनी?
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची मोठी सभा पार पडली, मात्र या सभेला मविआचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दांडी मारली. नाना पटोले सभेला गौरहजर असल्यानं तर्क वितर्काला उधाण आलं. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालची सभा उत्तम पार पडली. नाना पटोले आजारी होते, त्यामुळे ते या सभेला येऊ शकले नाहीत. मात्र पुढच्या सभेला ते नक्की हजर असतील असं राऊत यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
पदवीवरून भाजपला टोला
दरम्यान यावेळी बोलता संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून भाजपला खोचक टोला लगावला आहे. अनेक लोक म्हणतात पंतप्रधान मोदींची पदवी फेक आहे. मात्र माझा पूर्ण विश्वास आहे की, पंतप्रधानांची पॉलिटिकल सायन्समधील पदवी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. त्यामुळे आता ती पदवी नवीन संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावी असा खोचक टोला राऊत यांनी मोदींना लगावला आहे. तसेच भाजपच्या अनेक लोकांच्या पदव्या बोगस असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.