मुंबई, 24 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मविआ आज आहे उद्याच सांगता येत नाही’ असं वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली होती. पण, अखेरीस शरद पवारांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
शरद पवार यांनी अमरावतीमध्ये महाविकास आघाडी पुढे राहील की नाही माहिती नाही, असं विधान केले त्यानंतर वेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेरीस या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘महाविकास विकास आघाडी विषयी जे काही बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. जागा वाटपची चर्चा झाली नाही, तर मी कसं सांगू की महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही. जागावाटप नंतरच कळेल की कोण किती जागा लढवत आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. यामुळे भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे.
महाविकास आघाडी ऐक्य राहवी ही भूमिका आहे पण जागा वाटप काहीच चर्चा नाही याचा संदर्भ देत विधान केल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मविआबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. मविआ आज आहे, उद्या सांगता येत नाही. मात्र आमची एकत्र काम करण्याची तयारी आहे. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या सूचक वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचं मात्र टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवारांची चर्चा
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र आता शरद पवार यांनी मविआबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.