अंजली सिंग राजपूत, प्रतिनिधी लखनऊ : लोणचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते केरी, आवळा, लिंबू गेला बाजार अगदीच कारलं किंवा करवंद, याशिवाय मिरची आणि मिक्स भाज्यांचं लोणचं पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की मशरुमचंही लोणचं तयार केलं जातं. ह्या लोणच्याचा व्यवसाय करुण एक तरुणी लाखो रुपयांची कमाई करत आहे.
सध्या बाजारपेठेत ढिगाने उत्पादनं आली आहे. स्पर्धेत टिकून राहायचं तर दोन महत्त्वाच्या गोष्टी करायला हव्यात एक तर वेगळेपणा आणि दुसरं चव उत्तम असायला हवी तेव्हाच व्यवसाय दीर्घकाळ तक धरून राहू शकतो. हेच या तरुणीनं ओळखलं आणि तिने मशरुमद्वारे वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या. मशरुमचं लोणचं, पापड, लाडू असे प्रोडक्ट तयार करून तिने बाजारात विकायला आणले.
दीपा हंसलने मशरूमपासून लोणचे, चिप्स, केक, हलवा आणि लाडू बनवले आहेत, ज्याचा आजच्या आधी कोणी विचारही केला नसेल. एवढेच नाही तर दीपाने तिच्या घरी मशरूमच्या दोन नवीन प्रजातीही उगवल्या आहेत. ज्यामध्ये मिल्की मशरूम आणि ऑयस्टर मशरूमचा समावेश
तब्बल 12 वाघांचं पालनपोषण करणारा ‘शेर मोहम्मद’; 34 वर्षांचा अनुभव ऐकून थरकाप उडेल, Video
2021 मध्ये लॉकडाऊननंतर त्यांनी त्याचा वापर करून आपल्या घरी शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला जेव्हा लोकांनी यापासून बनवलेले पदार्थ खायला दिले तेव्हा त्यांना ते खूप आवडले. लोकांची वाढती मागणी पाहून तिने तो आपला व्यवसाय केला आणि आज ती लाखोंची कमाई करत आहे.
दीपा हंसलशी बोलले असता तिने सांगितले की, तिच्या स्टार्टअपचे नाव डिव्हाईन मशरूम आहे. सुरुवातीला त्यांनी मशरूमची शेती सुरू केली तेव्हा ही शेती इतकी यशस्वी होईल असे वाटलं नव्हतं. त्यांनी घरीच बिया बनवायला सुरुवात केली आणि मशरूमची वेगळी विविधता वाढल्यावर त्याद्वारे लोणचे, चिप्स, केक आणि लाडू बनवले, जे लोकांना खूप आवडले.
घरातील तेलाची गरज भागवण्यासाठी पिता-पुत्रांनी शोधली आयडिया, तुम्हीही घेणार का आदर्श? Video
लखनऊमध्ये मशरूमचे लोणचे लोकांची पहिली पसंती आहे. त्याची किंमत 150 रुपये असून तो 200 ग्रॅमचा बॉक्स आहे. त्यात लसूण आणि हिरवी मिरची असल्याने याची चव आणखीन चांगली लागते.
तुम्हालाही दीपा हंसल यांच्याकडून मशरूम लागवडीबाबत अधिक माहिती हवी असल्यास दीपा हंसल यांच्या ९१४०७ ८५६६४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून माहिती मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.