चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
15 मे, पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात भाजप आमदार, शहर पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला, तसंच विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळिक यांच्या कार्य अहवालाचंही प्रकाशन केलं. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकींच्या तारखांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्यातील महापालिका निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पहिली लढाई मनपाची आहे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कधी होतील माहिती नाही, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं आहे. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या निकालावरून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
‘कोरोना काळात भाजपने जगदीश मुळिक यांच्या नेतृत्वात खूप मोठं समाजकार्य केलं, लोकांना उपाशी झोपू दिलं नाही. सर्वतोपरी मतद केली, पण तत्कालिन सरकार त्याकाळीही कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करून मयतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं,’ असा आरोप फडणवीस यांनी केला.
तुमच्या शहरातून (पुणे)
‘मोदींच्या काळात भारत नऊ वर्षात खूप बदलला आहे, आपण प्रचंड प्रगती केली, खरंतर मनमोहन सिंग खूप चांगले पंतप्रधान होते, पण आंतरराष्ट्रीय स्टेजवर फारसे छाप पाडू शकले नाहीत. याऊलट मोदी यांच्या काळात जगात आपली मान उंचावली आहे. जगात सगळीकडे मंदी असतानाही आपल्या देशात मोदीजींना लोकांना स्वत:च्या पायावर उभं केलं. शासकीय योजनांमधून लोकांना मदत केली. पायाभूत सुविधांची कामं सुरू असल्यामुळे लोकांना रोजगार मिळतोय, अर्थव्यवस्थेला चालना मिळतेय,’ असं फडणवीस म्हणाले.
महाविकासआघाडी ऍक्टिव का? कर्नाटक निकाल नाही तर… अजितदादांना वेगळीच शंका
‘खरंतर आपण युतीत लढलो होतो, पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खूर्चीसाठी अभद्र युती केली, म्हणूनच आम्हाला हे सरकार घालवावं लागलं. खरंतर या लढाईत मी घरीही बसायला तयार होते, पण आपल्या पक्षश्रेष्ठींनी मला सन्मानाने उपमुख्यमंत्रीपदावर बसवलं. हे आपलं सरकार आहे. पुणेकरांच्या भल्यासाठी 40 टक्के करसवलतीचा निर्णय आम्ही एका झटक्यात घेतला. एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिली. ओबीसींकरता 10 लाख घरं बांधतोय,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.
कर्नाटकवरून टोला
‘कर्नाटकमध्ये पराभव झाला असला तरी भाजपची मतांची टक्केवारी कुठेही कमी झाली नाही. लोकसभेला याच कर्नाटकमध्ये भाजपचे 25 खासदार निवडून येतील. या निकालानंतर राष्ट्रवादीवाले बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंचंही तसंच सुरू आहे. पण महाराष्ट्रात यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. इथे मोदींच्या नेतृत्वात भाजपच निवडून येणार,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
ठाकरे गटाने प्रयत्न केले तरीही… अजितदादांचं शिंदे सरकारबद्दल मोठं विधान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.