विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी
पंढरपूर, 19 मे : सबसे कातिल गौतमी पाटील” म्हणून परिचित असलेली लावणी नृत्यागंना गौतमी पाटील कायम कुठल्यान कुठल्या वादात अडकून चर्चेत असते. छोटा पुढारी म्हणून ओळख मिळवलेल्या घनश्याम दराडे याने गौतमीलाच ‘महाराष्ट्राचा बिहार न करण्याचा’ सल्ला दिला. तसे न केल्यास आम्हाला पण मुसंडी मारावी लागेल असा इशारा घनश्यामने दिला. गौतमीला ताई म्हणत दिलेल्या इशाऱ्यामुळे सबसे कातिल गौतमी पाटील घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. घनश्याम दराडे याला गौतमी पाटीलने प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मी महाराष्ट्राची संस्कृती जपते, मागच्या गोष्टी सोडून पुढे जाते. मी असं काय केलं आहे? मी महाराष्ट्राचा बिहार करायला काय केलं? त्याचं उत्तर द्या,’ असा प्रतिप्रश्न गौतमी पाटीलने घनश्याम दराडेला विचारला आहे. सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याच्या वाढदिवसा निमित्त गौतमी पाटील कार्यक्रमास आली होती.
काय म्हणाला होता छोटा पुढारी?
आपला आणि गौतमीचा कोणताही वाद नसला तरी लावणी बदनाम होऊ नये, म्हणून आपण इशारा दिला असल्याचे छोट्या पुढारीने सांगितले. छोटा पुढारी घनश्याम दराडेचा नवीन चित्रपट मुसंडी प्रदर्शित होणार असून त्याआधी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी तो आला होता. त्यावेळी त्याने थेट गौतमीलाच इशारा देऊन मुसंडी मारावी लागेल, असे म्हणत चित्रपटाला प्रसिद्धीच मिळवून देण्याचा प्रकार केला आहे.
सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही विचार नाही, जेव्हा असं काही ठरेल तेव्हा मी नक्की सांगेन, असं म्हणत गौतमीने तिच्या लग्नाबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसंच बार्शीमधला कार्यक्रम हा आयोजकांनि तिकिटावर आयोजित केला होता, त्यामुले त्यांनी सांगितलं तेव्हाच मी स्टेजवर जाणार, यात माझी काय चूक आहे, असं स्पष्टीकरण गौतमीने दिलं. नाशिकमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात चाहत्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली, ही घटना चुकीची आहे, अशा गोष्टींचा निषेध झाला पाहिजे, असं गौतमी पाटील म्हणाली.
गौतमीविरोधात गुन्हा दाखल
गौतमी पाटील हिच्यावर सोलापूरच्या बार्शी येथे फसवणुकीच्या गुन्हा दाखल झाला आहे. 12 मे रोजी बार्शी येथे राजेंद्र गायकवाड यांनी गौतम पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता, पण या कार्यक्रमाला उशीर झाला. रात्री दहा वाजता वेळेची मर्यादा ओलांडल्यामुळे गौतमी पाटीलचा कार्यक्रम पोलिसांनी बंद पडला. आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी कोणतीही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतली नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच लेखी कळवूनही गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.