मुंबई, 15 एप्रिल: CAPF कॉन्स्टेबल परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दलात (CRPF) भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
आता CAPF भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत सेट केली जाईल.
शत्रूचा नायनाट करण्याची आणि देशसेवेची सर्वात मोठी संधी; BSF मध्ये मोठ्या भरतीची घोषणा; करा अप्लाय
गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, 1 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल.
‘ते’ नुसते दिसले तरी थरथर कापतात गुन्हेगार; आतापर्यंत तब्बल 60 एन्काऊंटर केलेले IPS आहेत तरी कोण?
गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापर आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.
उल्लेखनीय आहे की तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते. स्टॅलिन यांनी या भरती परीक्षेत ‘बेसिक हिंदी अंडरस्टँडिंग’साठी ठेवलेल्या 25 टक्के गुणांची तक्रार केली होती. स्टॅलिन म्हणाले होते की, तमिळसोबत इतर प्रादेशिक भाषांनाही त्यात ठेवायला हवे. स्टॅलिन म्हणाले की, यामुळे तामिळनाडूतील तरुणांची सीएरपीएफ नोकरीसाठी निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे. स्टॅलिन यांनी अमित शहांना सांगितले की, उमेदवारांना तमिळ आणि इतर भाषांमध्येही परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.