मुंबई, 15 एप्रिल: हिंदू धर्मात अशी अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत, ज्यांचे भाविकांमध्ये खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशी काही प्रसिद्ध मंदिरे आहेत, ज्यांची कीर्ती दूरवर पसरली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 10 प्रमुमहाराष्ट्र हे केवळ प्रेक्षणीय स्थळांसाठीच नाही तर धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे राज्य आहेख मंदिरांबद्दल जाणून घेऊया.
सिद्धिविनायक मंदिर
गणपतीला समर्पित हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटीही येथे येतात. देशातील सर्वात व्यग्र धार्मिक स्थळांमध्ये या ठिकाणाची गणना होते. धार्मिक श्रद्धेनुसार येथे उत्कट मनाने व्यक्त केलेल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात.
शिर्डी मंदिर
आजच्या काळात हे ठिकाण लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झाले आहे. हे मंदिर शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 20 व्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
शनी शिंगणापूर मंदिर
अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूरचे शनी मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. येथे असलेली शनिदेवाची विशाल मूर्ती खुल्या आकाशाखाली संगमरवरी मचाणावर कोणत्याही छत किंवा घुमटविना विराजमान आहे. भक्तांच्या सर्वमनोकामना पूर्ण करणाऱ्या शनिदेवाच्या दर्शनाला भाविकांची नेहमीच अलोट गर्दी असते.
हरिहरेश्वर मंदिर
पश्चिम घाटातील उंच पर्वतांनी वेढलेले हे मंदिर त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू, महादेव, ब्रह्मा आणि माता योगेश्वरी या मंदिराच्या मुख्य देवता आहेत.
मार्लेश्वर मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यात बांधलेले हे एक गुहा मंदिर आहे आणि भगवान शिवाला समर्पित आहे. असे मानले जाते की हे मंदिर भगवान परशुराम यांनी बांधले होते.
वज्रेश्वरी मंदिर
मुंबईपासून 75 किमी अंतरावर ‘वज्रेश्वरी’ नावाचे एक ठिकाण आहे, जिथे वज्रेश्वरी देवीची पूजा केली जाते. या ठिकाणी रेणुका, वज्रेश्वरी आणि कालिका या तीन देवी विराजमान आहेत.
परळी वैजनाथ मंदिर
हे मंदिर बीड जिल्ह्यात आहे आणि भगवान शिवाचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे, ज्यामध्ये भगवान वैजनाथ वास करतात. हे महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. याच्या दर्शनाला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भाविक भक्तांची नेहमीच रीघ लागलेली असते.
रांजणगावचा महागणपती
हे मंदिर 9व्या किंवा 10व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथे सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात, जी अतिशय सुंदर दिसतात.
त्र्यंबकेश्वर मंदिर
ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आणि नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर बांधलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. हे जगातील असे मंदिर आहे जेथे भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव तिन्ही मुखे आहेत.
ज्योतिबा मंदिर
कोल्हापुरात स्थित ज्योतिबा हा भगवान केदारनाथचा अवतार मानला जातो. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी मिळून रत्नासुर राक्षसाचा वध केल्याची आख्यायिका आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.