नवी दिल्ली : एकीकडे खूप जास्त गरम होत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात काही जिल्ह्यांमध्ये मात्र धो धो पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने 5-7 राज्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हा पाऊस अक्षरश: जुलै महिन्यासारखा कोसळत आहे. ऐन उन्हाळ्यात नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. हे सगळं असलं तरी पिकांचं अतोनात नुकसान मात्र होत आहे.
पुढचे तीन दिवस उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी (2 मे) संपूर्ण देशात मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसांत कमाल तापमानाबाबत दिलासादायक अंदाज विभागाने वर्तवला आहे. येत्या १५ दिवसांत कमाल तापमान सामान्यापेक्षा कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.
हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, ओडिशा, झारखंड, बिहार, कर्नाटक तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, पंजाब, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा सौराष्ट्र आणि कच्छ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.
Himachal Pradesh | Heavy rain lashes Shimla, IMD issues orange alert for three days. (01.05) pic.twitter.com/KQlJiEhl8V
— ANI (@ANI) May 1, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.