नांदेड, ता.२३
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पक्ष बांधणी या विषयावर वक्ता सेलची बैठक घेतली,यावेळी माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका कणखरपणे मांडणाऱ्या काही प्रतिनिधीची राज्य सेलच्या कमिटीवर नियुक्ती करण्यात आली. यामध्ये नांदेडचे काँग्रेसचे विचारवंत आणि मिडिया पॅनलिस्ट बालाजी गाडे यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.प्रदेश पातळीवर वक्ता सेलच्या नियुक्तीमुळे राज्यभरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.
बालाजी गाडे हे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून येतात.आतापर्यंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ते पदी देखील त्यांनी काम केले असून एक सामान्य घरातील तरुणाला त्यांच्या राजकीय ज्ञान आणि वत्कृत्व कौशल्यामुळे प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सामान्य घरातील तरुणाचा ओढा देखील काँग्रेसकडे वाढल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
युवक काँग्रेसमध्ये असताना विविध सामाजिक उपक्रम राबवत काँग्रेस पक्षात तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी केलेल्या कार्याची पावती आज बालाजी गाढे यांना मिळाली असे गौरदोगार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी काढले.
उत्तम संभाषण,भाषण कौशल्य असलेले बालाजी गाढे यांनी नेहमीच राज्यातील युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे,त्यांना मिळालेल्या नव्या जबाबदारीने ते अधिक जोमाने काम करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे असे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी म्हंटले.
पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी आणि दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचे रान करून तरुणांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेल. तरुणांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबवत त्यांच्या कौशल्याला न्याय देण्याचे आणि प्रसंगी त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून लढायला मी तयार आहे असे यावेळी बालाजी गाढे पाटील यांनी सांगितले.