मुंबई, 20 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं. या सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. मात्र आता या प्रकरणाला वेगळ वळण लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे मृत्यू झाले ते उष्मघातामुळे नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. नाना पटोले यांनी केलेल्या आरोपानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
तुमच्या शहरातून (मुंबई)
संजय राऊत यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोलेंच्या मागणीशी मी सहमत आहे. राज्य सरकार खरा आकडा लपवतंय, मृत्यूवर बोलू नये यासाठी अनेकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडावर बोलणारे आता गप्प का? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला आहे.
मोठी बातमी! राज ठाकरे आज पुन्हा घेणार एकनाथ शिंदेंची भेट
पटोलेंनी काय म्हटलं होतं?
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो’ अशी मागणी करणारं ट्विट पटोले यांनी केलं होतं. सोबतच त्यांनी या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.