पियुष पाठक (अलवार), 12 मे : कुस्ती म्हंटल की बलदंड शरीर पैलवानकीचा आब असल्याने पैलवान उठून दिसत असतो. पण आज आम्ही तुम्हाला मदर्स डे निमीत्त अशाच एका व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगणार आहोत. राजस्थानमधील अलवरच्या जिल्ह्याच्या एक महिला कुस्तीपटू आहेत मुलींच्या भविष्यासाठी कुस्तीपटू तयार करत आहेत. इतकंच नाही तर त्या तिच्या कामासोबतच कुटुंबाचीही चांगली काळजी घेत आहे.
अंजना शर्मा या अलवरच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. अंजना या मुळच्या उत्तर प्रदेशच्या आहेत. पण त्यांची राजस्थानच्या मातीशी नाळ जोडली गेल्याने मुलींना कुस्ती शिकवण्यासाठी कंबर कसली आहे.
Cricket : 8 भारतीय क्रिकेटर्स करतात उच्च पदाच्या सरकारी नोकऱ्या
News18 शी खास बातचीत करताना महिला कुस्तीपटू कोच अंजना शर्मा म्हणाल्या की, साधारणपणे महिला आई झाल्यानंतर नोकरी सोडतात. पण इतर मुलींचा विचार करून मी माझे काम कधीच सोडले नाही. ज्या प्रकारे संघर्ष करत आज मी हे स्थान मिळवले आहे. तसेच कोणत्याही मुलीला एवढा संघर्ष करावा लागू नये. यासाठी मी माझ्या मुलाचा सांभाळ करण्यासोबतच मुलींना कुस्ती शिकवत आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, मी उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका गावातील रहिवासी आहे. आजही मी राहत असलेल्या गावातून प्रत्येक गावकऱ्याला शहरात जाण्यासाठी बससाठी 5 किलोमीटर चालावे लागते. पहिल्यापासून माझा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी आल्या पण मी कधीही हार मानली नाही. आणि माझ्या जिद्दीने पुढे जात आहे. माझ्या गावातील मी पहिली महिला कुस्तीगीर आहे जिने आज ही पातळी गाठली असल्याचे त्या म्हणाल्या.
महेंद्रसिंह धोनी खेळणार शेवटचं IPL? मॅनेजमेंटने निवृत्तीबाबत केला मोठा खुलासा
आज माझ्या यशामागे माझ्या आईचा सर्वात मोठा हात असल्याचेही अंजना म्हणाली. माझी आई प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. माझे कुटुंबही माझ्या स्वप्नात माझ्यासोबत राहिले. आता येणार्या काळात प्रत्येक मुलीने स्वावलंबी होऊन कुस्ती खेळून देशाचे आणि राजस्थानचे नाव लौकिक मिळवावे हे माझे एकच ध्येय आहे. म्हणूनच मी सर्व खेळाडूंना माझी मुलगी आणि मुले समजून प्रशिक्षण देत असल्याचे त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.