मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफसाठीचे सामने रंगात आले आहेत. यावर्षी देखील चेन्नई सुपरकिंग्स चांगली कामगिरी करत आहे. चेन्नई टीमने 12 सामने खेळले असून 7 जिंकले आहेत तर 4 सामने गमावले आहेत. धोनी हे शेवटचं आयपीएल खेळणार का, तो निवृत्ती घेणार का यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. याच दरम्यान चेन्नईच्या मॅनेजमेंटकडून धोनीच्या निवृत्तीवर मोठा खुलासा करण्यात आला आहे.
इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार मॅनेजमेंटमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, धोनी कधी निवृत्ती घेणार याची कल्पना त्याने कुणालाही दिली नाही. एक ना एक दिवस असा नक्कीच येईल की तो निवृत्तीची घोषणा करेल हे आम्हालाही माहिती आहे. त्याला आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तो ती पूर्ण केल्याशिवाय निवृत्ती घेणार नाही.
चेन्नई टीमला आपला पुढचा कर्णधारही निवडायचा आहे. सध्या आमच्याकडे फारसे पर्याय नाहीत. बेन स्टोक्स दुखापतींशी झुंज देत असल्याने त्याच्याकडे जबाबदारी सोपवू शकत नाही. जडेजाला संधी होती पण तो जबाबदारी सांभाळू शकला नाही. धोनीने आम्हाला आयपीएल 2023 च्या शेवटी निवृत्ती घेण्याबद्दल तरी काहीही कल्पना दिली नाही.
धोनीने या मोसमात चेन्नई सुपर किंग्जसकडून खेळताना चांगली बॅटिंग केली. मागच्या वर्षीही धोनी फार खेळला नाही, त्याने जास्त धावाही काढल्या नाहीत. मात्र कमी वेळात त्याने सर्वांची मनं मात्र जिंकली.
Cricket : 8 भारतीय क्रिकेटर्स करतात उच्च पदाच्या सरकारी नोकऱ्या
चेन्नईच्या आताच्या सामन्यातही त्याने मारलेले शॉट्स जबरदस्त होते. शेवटचे काही बॉल खेळताना त्याने अनेक सामन्यांमध्ये जबरदस्त सिक्स ठोकले आहेत. धोनीने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 204.26 च्या घातक स्ट्राईक रेटने 96 धावा केल्या. यादरम्यान त्याने आपल्या बॅटमधून 10 सिक्स आणि 3 फोर मारले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.